रेसिपी शोधा

कांदा भजी - Kanda Bhji

कांदा - १ मध्यम किंवा १ उभे पातळ काप केलेला
हिरवी मिरची, - १ , बारीक चिरलेली
आले पेस्ट अथवा ताजे किसलेले आले - दिड चमचे
कढीपत्ता - ४-५, पर्यायी चिरून
कोथिंबीर - १ चमचे , बारीक चिरलेला
मीठ - चवीनुसार
हळद - ¼ चमचे
लाल तिखट - १ चमचे
धणे पावडर - दिड चमचे
ओवा  - ¼ चमचे
बेसन - कप दिड ते ⅓
तांदळाचे पीठ - 2 tablespoons

कृती -

एका भांड्यामध्ये काप केलेला कांदा घ्या .
त्यात चिरलेली हिरवी मिरची, कोथिंबीर, कढीपत्ता आणि आले पेस्ट टाका व चांगले मिक्स करून घ्या .
नंतर मीठ, हळद, लाल तिखट, धणे पावडर आणि ओवा टाका.
मग तांदळाचे पीठ व बेसन घालून चांगले मिक्स करा. जेणेकरून सर्व मसाला आणि पीठ कांद्याला व्यव्सतित झाकेल . आवशकता असेल तर बेसनाचे प्रमाण वाढाऊ शकता जेणेकरून कांद्यावर एक प्रत तयार होईल .
आता तयार झालेले मिश्रण १५ ते २० मिनिटे बाजूला ठेवा .
यादरम्यान कांदा पाणी सोडू लागेल आणि मिश्रण जर ओले दिसु लागेल . या मिश्रणात अतिरिक्त पाणी टाकायची आवशकता नाही कारण कमी पाणी जास्ती कुरकुरीत भजी .
आता कढई गॅस वर ठेऊन त्यात तेल गरम करायला ठेवा . तेल गरम झाल्यावर त्यात मिश्रणाचा एक थेम सोडून तेल पुरेसे गरम झाले कि नाही याची खात्री करून घ्या . जर तेल पुरेसे गरम झाले नसेल तर भजी खूप सारे तेल शोषून घेईल अथवा तेल खूप गरम झाले असेल तर बाहेरील भाग जळून आतमधला भाग कचा राहील .
आता हळू हळू थोडे थोडे मिश्रण हातात घेऊन ते तेलात सोडा आणि दोन्ही बाजूंने गोल्डन ब्राऊन होईपर्यंत भजी तळा . तळतअसतानाच त्यांना मधून मधून फिरवत रहा . जेणेकरून खूप गर्दी होणार नाही आणि भजी योग्य पद्धतीने तळ्ल्या जाईल.

तयार झालेली भजी एका प्लेट मध्ये काढून टाका. आणि गरम सर्व्ह करा.

Popular Posts

हॅप्पी भाग जएजी हिंदी फिल्म