रेसिपी शोधा

पत्ता कोबी पराठा - Patta Kobi Pratha

पत्ता कोबी पराठा - Patta Kobi Pratha

साहित्य :
  • पत्ता कोबी - ५०० ग्राम (किसून बारीक केलेली )
  • गव्हाचे पीठ - १०० ग्राम 
  • ओवा - १/२ छोटा चमचा 
  • जीर - १/२ छोटा चमचा 
  • हळद - १/२ छोटा चमचा 
  • हिरवी मिरची - १ ( चिरून तुकडे केलेली)
  • लाल तिखट - १ छोटा चमचा (किंवा आव्श्क्तेनुसार )
  • तेल - १ मोठा चमचा 
  • मीठ - आव्श्क्तेनुसार 
कृती :
  • एका भांड्यात गव्हाचे पीठ , किसलेला कोबी , हळद , लाल तिखट , हिरवी मिरची, जीर, ओवा आणि आव्श्क्तेनुसार मीठ टाका व सर्व मिश्रण चांगल्या पद्धतीने मिक्स करून घ्या . 
  • एका भांड्यात थोड तेल गरम करायला ठेवा . तेल गरम झाले कि ते त्या मिश्रणात टाका , व थोडे थोडे पाणी टाकीत मिश्रणाला मिक्स करीत एक गोळा तयार करा . तयार गोळ्याला चांगले गुळगुळीत होईपर्यंत मळा . व जवळ जवळ आर्ध्या तासाकरिता बाजूला ठेवा . 
  • आता तयार मिश्रणाचा थोडासा भाग घेऊन पोळी लाटायला घ्या . 
  • दरम्यान तवा गरम करायला ठेवा . तवा गरम झाला कि त्यावर थोडे तेल टाका व चमच्याने गोल पसरून घ्या . आता त्यावर पोळी टाका व थोडी भाजू द्या . आता पोळी पलटवा व दुसरी बाजू तव्यावर टाका . सभोवताली थोडे चमच्याने तेल सोडा . 
  • पोळी चांगली भाजली कि ती एका प्लेटमध्ये जमा करा , व गरमा गरम सर्व करा . 

Popular Posts

हॅप्पी भाग जएजी हिंदी फिल्म