रेसिपी शोधा

शेंगदाणा चिक्की - Peanuts Chikki

शेंगदाणा चिक्की - Peanuts Chikki
साहित्य :
  • शेंगदाणे - 250 ग्रॅम .
  • गूळ किंवा साखर - 250 ग्रॅम .
  • तूप - थोडेसे तूप 
कृती :
  • सर्वप्रथम आख्या शेंगदाण्यात थोडे पाणी टाका व चांगले ढवळून ५ मिनिटांकरिता बाजूला ठेवा . त्यानंतर तव्यावर भाजायला ठेवा . हलका रंग झालाकी शेंगदाणे खाली उतरून थंड करायला ठेवा . थंड झाले कि सोलून साल वेगळे करा . 
  • आता एका प्यान मध्ये थोडे तूप टाकून गरम करा . आणि त्यात गुळ बारीक करीत टाका व मध्यम आचेवर ठेवा . थोड्यावेळात गुळ वितळायला लागते . गुळाला नियमित ढवळत चला . ५ ते ६ मिनिटानंतर चमच्याने एक थेंब काढा थेंब घट्ट झाला कि तुमचे मिश्रण तयार आहे नाहीतर पुन्हा २ ते ३ मिनिटे आणखी सिजु द्या . 
  • आता शेंगदाणे मिश्रणात टाकून २ ते ३ मिनिटे ढवळत शिजू द्या . एका प्लेटला थोडे तूप लाऊन तातडीने मिश्रण प्लेटमध्ये टाकून पसरून घ्या . आणि चाकूच्या मदतीने हव्या त्या आकाराचे काप करून घ्या . व थंड होऊ द्या . 
  • तुमची खमंग शेंगदाणा चिक्की तयार आहे . 

Popular Posts

हॅप्पी भाग जएजी हिंदी फिल्म