रेसिपी शोधा

वटाना कोप्ता - Vatana Kopta

वटाना कोप्ता - Vatana Kopta

साहित्य :
  • हिरवा वाटाणा - १ कप 
  • बटाटा - २ मोठे 
  • बेसन - एक मोठा चमचा 
  • अद्रक , लसुन पेस्ट - २ छोटा चमचा 
  • हिरवी मिर्ची - २ ते ३ छोटी 
  • जीर - १ लहान चमचा 
  • हळद - १/४ लहान चमचा 
  • धने पावडर - १ छोटा चमचा 
  • लाल तिखट - आव्श्क्तेनुसार
  • टोमाटो - २०० ग्राम 
  • तेल - तळायला आव्श्क्तेनुसार
  • मीठ - आव्श्क्तेनुसार
कृती :
  • सर्व प्रथम बटाटा एका भांड्यात पाणी टाकून उकळायला ठेवा . बटाटा उकळल्यानंतर सोलून बाजूला ठेवा . आता वाटाणा चांगला धून घेऊन मिक्सी मध्ये बटाटा जरा जाडा बारीक करून घ्या . आता एका भांड्यात बटाटा , वाटाणा , हिरवी मिर्ची (बारीक किसलेली ), थोडी अद्रक लहसून पेस्ट , आणि बेसन चांगले मिक्स करून घ्या . 
  • आता तयार मिश्रणाचे छोटे छोटे गोळे तयार करा . व बाजूला ठेवा . 
  • एका कढईत तेल गरम करायला ठेवा . तेल गरम झाले कि त्यात कोप्ते तळायला टाका व हलके तपकिरी होईपर्यंत तळून घ्या . व एका प्लेटमध्ये जमा करा . 
  • आता टमांटर आणि थोडी हिरवी मिर्ची मिक्सी मध्ये बारीक पेस्ट करून घ्या . 
  • एका कढईत थोडे तेल गरम करायला ठेवा. तेल गरम झाले कि त्यात थोडे जिरे, हळद पावडर आणि धने पावडर टाकून हलके परतून घ्या . आता त्यात टमाटरची पेस्ट टाका व जरा वेळ परता 
  • आता त्यात आव्श्क्तेनुसार पाणी टाका व त्यात आव्श्क्तेनुसार मीठ आणि लाल तिखट टाकून एक उकळी येऊ द्या . उकळी आली कि ग्यास बंद करा व त्यात तळलेले कोप्ते टाका व थोड्या वेळ झाकून ठेवा. 
  • तूमची वाटाणा कोप्त्याची भाजी तयार आहे . ती एका भांड्यात काढून थोड्या हिरव्या कोठीम्बिरणे सजवा . 

Popular Posts

हॅप्पी भाग जएजी हिंदी फिल्म