रेसिपी शोधा

प्रसादाची बुंदी - Prasad Boondi

प्रसादाची बुंदी - Prasad Boondi
NEW BOLLYWOOD MOVIE



साहित्य :
  • उडदाची डाळ - १/२ कप 
  • साखर - ४ कप 
  • मैदा - २०० ग्राम 
  • काजू - ५० ग्राम (तुकडे केलेले)
  • केसर - ६ ते ७ धागे ( थोड्या गरम दुधामध्ये थोडया वेळ भिजवलेले )
  • वेलची - ४ ते ५ (कुटून पूड केलेली )
  • तेल - तळण्याकरिता 
कृती :
  • सर्वप्रथम उडदाच्या डाळीला चांगली धुऊन २ ते ३ तासांकरिता पाण्यात भिजत ठेवा . नंतर पूर्ण पाणी काढून घ्या . 
  • आता तयार डाळीला मिक्सरमध्ये चांगली बारीक करून घ्या . 
  • आता एका पातेल्यात १  १/२ कप पाणी टाका आणि त्यात साखर टाकून चाचणी बनवायला ठेवा . 
  • दरम्यान एका भांड्यात बारीक केलेली डाळ च्या , त्यात मैदा टाका व केसचे दूध टाकून फेटा . 
  • थोडे थोडे पाणी टाकीत सर्व गाठी काढीत मिश्रण चांगले ढवळून घ्या . मिश्रण खूप जास्ती पातळ किंवा घट्ट होता काम नये . 
  • तयार चाचणीला चमच्याने ढवळीत बुडविलेला चमचा थोडा वर उचला आणि पडणाऱ्या थेंबाचा तार तुटतोय कि नाही हे चेक करा . व तयार चाचणीला ग्यासच्या खाली उतरून ठेवा . चाचणी थोडी गरमच राहील याची काळजी घ्या . 
  • आता पॅन मध्ये तेल गरम करायला ठेवा . तेल चांगले गरम झाले कि एकाद्या झारीला पॅनवर उलटे पकडून थोडे थोडे मिश्रण हाताने झर्यावरती पसरवीत तेलात बुंदी तळा. 
  • बुंदी हलकी सोनेरी झालीकी गरम गरमच तेलातून काढून चाचणीत टाका व ५ ते ६ मिनिटे ठेवा व एखाद प्लेटमध्ये काढून थंड होऊ द्या . 
  • काजूचे तुकडे बुंदी गरम असतांनाच टाकून मिक्स करून घ्या . 
  • तुमची प्रसादाची बुंदी तयार आहे . 

Popular Posts

हॅप्पी भाग जएजी हिंदी फिल्म