रेसिपी शोधा

हरभऱ्याच्या डाळीचे वडे - Harbharyachya Daliche vade

हरभऱ्याच्या डाळीचे वडे - Harbharyachya Daliche vade
NEW BOLLYWOOD MOVIE


साहित्य :
  • हरभऱ्याची डाळ - २५० ग्राम 
  • बेसन - १ मोठा चमचा 
  • कांदा - २ मध्यम आकाराचे (बारीक काप केलेले )
  • हिरवी मिरची - २ ते ३ ( बारीक काप केलेली )
  • कढीपत्ता - ५ ते ६
  • कोथिंबीर - १/२ वाटी ( बारीक काप केलेली)
  • लाल तिखट - २ ते ३ छोटे चमचे (किंवा आवश्यकतेनुसार )
  • तेल - तळण्यासाठी 
  • मीठ - चवीनुसार 
कृती :
  • हरभऱ्याची डाळ चांगली स्वच्छ धुऊन घ्या व २ ते ३ तासांकरिता भिजत ठेवा . 
  • नंतर एखाद्या चाळणीमध्ये डाळ काढून सर्व पाणी काढून द्या . 
  • आता ती मिक्सर मध्ये हलकी बारीक करा . काही हरभऱ्याची डाळ सलग राहील याची काळजी घ्या . 
  • आता एक पातेल्यात डाळ घ्या , त्यात बेसन , कांदा , लालमिर्ची , हिरवी मोरची , कढीपत्ता , मोथिंबीर आणि मीठ टाकून मिश्रण चांगले एकजीव करा . 
  • एक कढईत तेल गरम करायला ठेवा . दरम्यान तयार मिश्रणाचे छोतासा भाग घेऊन हातांच्या मदतीने मध्यभागी जरा दाब देऊन गोल आकार द्या . 
  • तेल चांगले गरम झाले की तयार वडा अलगत तेलात सोडा . 
  • वड्याचा रंग सोनेरी , चुरकुरीत झालाकी त्याला पालटून दुसरी बाजू सुद्धा तळून घ्या . 
  • अश्याच पद्धतीने सर्व वडे तळून तयार करा व टोम्याटो केचप वा दह्यासोबत सर्व करा . 

Popular Posts

हॅप्पी भाग जएजी हिंदी फिल्म